शाहरुखच्या 'पठाण'चं रितेश देशमुखला वेड, बुक केलं सिनेमाचं तिकीट

By  
on  

बॉलिवूड बादशहा शाहरुख खानचा सिनेमा ब-याच मोठ्या कालावधीनंतर प्रदर्शित होतोय. रसिक प्रेक्षकांना मोहिनी घालणा-या किंग खानच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी आहे. पठाण या शाहरुखच्या  सिनेमाचं आज देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शन सुरु आहे.  चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय. तर प्रदर्शनापूर्वी हा सिनेमा वादाच्या भोव-यात अडकल्याचंसुध्दा चित्र होतो. पण आजच्या प्रदर्शनामुळे जिथे तिथे फक्त पठाणचीच चर्चा रंगलीय. 

अनेक कलाकार, फॅन्स  शाहरुख खानच्या 'पठाण'ला शुभेच्छा देत आहेत. तसेच पठाण पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जाण्याची विनंती करत आहेत. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखनेसुद्धा शाहरुख खानच्या पठाणसाठी केलेलं एक ट्विट व्हायरल होत आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाउंटवर पठाणचा पोस्टर शेअर करत लिहलंय, 'वादळ येत आहे... तुमचा सीटबेल्ट बांधून तयार राहा... खूप जास्त प्रतीक्षा करायला लावली.... पण डिअर शाहरुख खान तुला खूप शुभेच्छा... पठाण पाहण्यासाठी मी आधीच माझं तिकीट बुक केलं आहे'. असं म्हणत रितेश देशमुखने शाहरुख खानच्या पठाणसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पठाण चित्रपटात शाहरुख खानसोबत बॉलिवूड दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम आहे. दीपिका आणि शाहरुखच्या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहून चाहते प्रचंड खुश आहेत. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पसंत पडते. याशिवाय दबंग खान सलमानचासुध्दा यात कॅमिओ पाहायला मिळणार आहे. 

Recommended

Loading...
Share