'नाहीतर आम्ही मल्टिप्लेक्सचेच 'बांबू' लावू', पठाणमुळे मनसे आक्रमक

By  
on  

बॉलिवूड बादशहा शाहरुख खानचा सिनेमा ब-याच मोठ्या कालावधीनंतर प्रदर्शित होतोय. रसिक प्रेक्षकांना मोहिनी घालणा-या किंग खानच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी आहे. पठाण या शाहरुखच्या  सिनेमाचं आज देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शन सुरु आहे.  चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय. तर प्रदर्शनापूर्वी हा सिनेमा वादाच्या भोव-यात अडकल्याचंसुध्दा चित्र होतो. पण आजच्या प्रदर्शनामुळे जिथे तिथे फक्त पठाणचीच चर्चा रंगलीय. 

अनेक कलाकार, फॅन्स  शाहरुख खानच्या 'पठाण'ला शुभेच्छा देत आहेत. तसेच पठाण पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जाण्याची विनंती करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि मराठी सिनेनिर्माते अमेय खोपकर मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळाले.

चित्रपटानं पहिल्या दिवशी धुमाकूळ घातला आहे. पण या चित्रपटांमुळं मराठी चित्रपटांच्या शोजला कात्री लावण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामुळं आता मराठी चित्रपट विरुद्ध पठाण असं चित्र दिसत आहे. यावर आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मल्टिप्लेक्स चालकांना थेट इशारा दिला आहे.

पठाणच्या रिलीजमुळे मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्सवाले डावलणार हे चित्र स्पष्ट आहे, म्हणूनच अमेय खोपकरांनी मल्टिप्लेक्स चालकांना सज्जड दम भरलाय. थेट मल्टिप्लेक्सनाच बांबू लावू असा थेट इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे. 

काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वेड आणि वाळवी या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळं यानंतर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र पठाणमुळे मराठी सिनेमांना थेट कात्री मिळतेय. ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या स्क्रिन्स मिळत नसल्यानं मराठी चित्रपट सृष्टीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Recommended

Loading...
Share