By  
on  

मन उडू उडू झालं ! ह्रता दुर्गुळेची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी

देशभर यंदा उत्साहात मकरसंक्रांची साजरी झाली. करोना आणि लॉकडाऊनच्या तब्बल २ वर्षानंतर सर्व सण आनंदात साजरे झाले. नवविवाहितांसाठी मकरसंक्रांतीचा सण खुप खास आणि मानाचा समजला जातो. सौभाग्याच्या लेण्याची सुवासिनींमध्ये लयलूट करण्याबरोबरच हलव्याच्या गोड दागिन्यांनी तिला व पतीला  सजवलं जातं आणि खुप थाटात हा सण सासरी-माहेरी साजरा होतो. महाराष्ट्राची लोकप्रिय नायिका ह्रता दुर्गुळे हिचीसुध्दा लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत. हृताने लग्नानंतर आपली पहिली मकर संक्रांती साजरी केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

हृता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच हृताने लग्नानंतरच्या आपल्या पहिल्या संक्रांतीची झलक दाखवली आहे.

हृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपला आणि पती प्रतीकचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हे दोघं फारच आनंदात दिसत आहे. हृताने फोटो शेअर करत आपली पहिली मकरसंक्रांती साजरी झाल्याचं सांगितलं आहे. काळी काठपदर साडी, सुंदर दागिने यामध्ये हृताचं सौंदर्य आणखीनच खुलुन दिसत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive