By  
on  

'पठाण' समोर रितेश-जिनिलियाचं 'वेड' कायम, यशस्वी चौथा आठवडा!

सध्या जिथे तिथे  किंग खान शाहरुखच्या 'पठाण'ची जबरदस्त हवा आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखने या चित्रपटातून दमदार कमबॅक केला आहे. ‘पठाण’चे चित्रपटगृहातील शो हाऊसफूल होत आहेत. आत्तापर्यंत ‘पठाण’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५७ कोटींची विक्रमी कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७० कोटींची गल्ला जमवत अवघ्या दोन दिवसांत पठाणने १२७.५० कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी ‘पठाण’च्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. तरी बॉक्स ऑफीसवर किंग खानचाच बोलबाला आहे. असं असलं तरी रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख यांचा मराठी चित्रपट वेडची हवा तसूभरही कमी झालेली नाही. 31 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपची जादू अद्याप बॉक्स ऑफीसवर कायम आहे. 

 

पठाणच्या दबदब्यातदेखील हा सिनेमा स्थिर उभा आहे. शाहरुखच्या चित्रपटाचा वेडवर फारसा परिणाम झालेला नाहीय,.

 

वेड चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 6.11 कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाने एकूण तब्बल 57.15 कोटींचा गल्ला जमवला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुखचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. अभिनेत्याने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलिया देशमुखने तब्बल दहा वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन तर केलंच शिवाय तिने अभिनेत्री म्हणून मराठीत पदार्पण केलं आहे.

रितेश-जिनिलिया जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive