मराठी सिनेविश्वासाठी एक वाईट बातमी. संगीतकार नंदू घाणेकर यांचे सोमवारी हृदयवविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी मुलुंड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचे बंधू नंदू घाणेकर यांनी गेली अनेक वर्षे संगीत दिग्दर्शन केले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवला होते. ‘ताऱ्यांचे बेट’, ‘शाली’’, ‘सुनंदा’, ‘नशीबवान’ या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.