By  
on  

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरेंचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी आपल्या मालवणी विनोदी शैलीतून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं  आहे. आता ते एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतायत. त्यांनी मनगटाला घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मोरे यांचा पक्षात प्रवेश झाला.पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या मुंबईत इथल्या मुख्य कार्यालयात प्रभाकर मोरे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. अजित पवारयांच्या उपस्थितीत मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

 कोकणातल्या कलाकारांच्याही काही अडचणी, व्यथा आहेत. त्या मांडण्यासाठी, सोडवण्यासाठी , त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी पक्षात प्रवेश केलाय, असं मोरे यांनी सांगितलं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive