By  
on  

पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचंं निधन

 दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळून आल्या.  वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण असून समोर आलं नसून त्यांच्या  कपाळावर जखम झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम  या  ७८ वर्षांच्या होत्या. त्यांना पद्मभूषण - भारतातील तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता.वाणी जयराम यांनी  मोठ्या संगीतकारांसोबत सदाबहार गाणी गायली आहेत. या प्रतिभावान गायिकेने  तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि ओरिया भाषेतील अनेक गाणी गायली आहेत. त्यांनी देशात आणि जगभरातील श्रोत्यांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive