By  
on  

दुष्काळग्रस्त भागातून आलेली अभिनेत्री या सिनेमात साकारतेय प्रमुख भूमिका

एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी तो क्षण येतो. नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यांतून आलेल्या अर्चना महादेव या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या वाट्याला मात्र हे भाग्य आले आहे. खडतर परिस्थितीवर मात करीत तिने जिद्दीने हे यश खेचून आणलं आहे. तिची मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेले 'घोडा' आणि 'मसुटा' हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळप्रवण भागात असलेल्या जामगाव या खेड्याची ओळख महादाजी शिंदे यांच्या वाड्यामुळे आहे. या ऐतिहासिक ओळखी बरोबरच आता हे गाव रुपेरी जगतात देखील अर्चना महादेवच्या नावाने ओळखले जाणार यात शंका नाही. बालपणीच पितृछत्र हरवलेल्या अर्चनाचा सांभाळ आईने शिवणकाम करत केला. आईच्या कष्टाचे चीज करणाऱ्या अर्चनाने आजवर अनेक एकांकिका, नाटके आणि लघुपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. तसेच तिने पडद्यामागे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन विभागातही आपल्या कामाचा अमिट ठसा उमटवला आहे. 

आजवरचा संघर्षमय प्रवास आणि आगामी दोन चित्रपटातील मुख्य भूमिकेत झळकण्याबद्दल बोलताना अर्चना महादेव म्हणाली, आपल्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर आपण गूगल वर शोधतो. पण एखादी भूमिका करायची असेल तर अभिनय करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या लोकांचा अभ्यास हा त्यांच्यासोबतच राहून करावा लागतो.साहजिकच त्यासाठी निरीक्षण ही फार महत्वाच असत. दोन्ही फ़िल्म मधील माझ्या भूमिका या फार वेगळ्या आहेत. मात्र, जन्म गावचा असल्यामुळे खऱ्या  जीवनात वाट्याला आलेला संघर्ष या भूमिका करताना खुप महत्वाचा ठरला.

आर्चना महादेवची मुख्य भूमिका असलेल्या  'घोडा' या चित्रपटाला दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात 'बेस्ट ज्यूरी अवॉर्ड'  तर 'मसुटा' या चित्रपटाला  विविध महोत्सव, पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive