By  
on  

बिग बॉस १६ फिनालेआधी शिव ठाकरेला रोहित शेट्टीने दिली मोठी ऑफर

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16 च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये पोहचलेला आपला मराठमोळा शिव ठाकरे हा या सीझनच्या विजेतेपदाचा दावेदार मानला जातो. या शोमध्ये त्याने भल्याभल्यांना कॉंटे की टक्कर दिली. या सीझनमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली. आता ग्रॅण्ड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. शिवला महाराष्ट्रातून खूप पाठिंबा मिळताना दिसत आहे.

मिडीया रिपोर्टनुसार, बिग बॉस हिंदी सीझन 16 चा विजेता जाहीर होण्यापूर्वीच शिवच्या हाती भाईजान सलमान खानचा आगामी सिनेमा आल्याचे बोलले जात आहे. आता अशातच शिवचं नशीब पुन्हा उजळलं आहे. त्याला आणखी एक मोठी ऑफर आली आहे. शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. बिग बॉसनंतर शिव ठाकरे रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी १३ मध्ये दिसू शकतो.

ग्रँड फिनाले आधी रोहित शेट्टी बिग बॉस घरात येऊन सर्व स्पर्धकांना टास्क करायला लावणार आहे. यातून तो खतरो के खिलाडी १३ साठी स्पर्धकही निवडू शकतो. बिग बॉसच्या एका प्रोमोमध्ये रोहित शेट्टी शिव ठाकरे, अर्चना गौतम, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी आणि शालीन भनोटला एक टास्क देताना दिसतो आहे. त्यानंतर तो तुमच्यापैकी एकाला खतरो के खिलाडीमध्ये जाण्याची संधी मिळेल असंही सांगताना दिसतो आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive