दाक्षिणात्य अभिनेत्रीसह हा मराठमोळा अभिनेता करणार रोमान्स

By  
on  

प्रेम म्हणजे न सुटणारं समीकरण असं गणितज्ज्ञ सांगतात, तर प्रेमात पडण्याचा गुरुत्वाकर्षाशी संबंध नाही असं आइन्स्टाइन सांगतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट "I प्रेम U" या अनोख्या चित्रपटात मांडली जाणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहार या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करत असून, कायदू आणि अभिजित अमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे.येत्या १७ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

"I प्रेम U" या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुर्सल, नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कायदू लोहारनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील  चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर एक सांगायचंय, टकाटक अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित अमकर या चित्रपटात दिसणार आहे.
 

Recommended

Loading...
Share