शिंदे गटाला धनुष्यबाण व शिवसेना नाव मिळाल्यानंतर मराठी अभिनेत्याचं ट्विट चर्चेत

By  
on  

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यात शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह काही महिन्यांपूर्वी गोठवण्यात आलं होतं. यावरुन बराच गदारोळ झाला. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

या निर्णयानंतर राजकीय सोबतच इतर वर्तुळातूनही विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. . मराठी अभिनेता आरोह वेलणकरनेही याबाबत ट्वीट केलं आहे. आरोहने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं आहे. “बाळासाहेब पण खूश असतील आज…” असं आरोहने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आरोहच्या या ट्विटवरुन एकूणच तो शिंदे गटाचं समर्थन करतोय हे दिसतंय. 

Recommended

Loading...
Share