By  
on  

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उलगडलं ‘मुसंडी’ चित्रपटाचं पोस्टर

यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे सांगणाऱ्या ‘मुसंडी’ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी'   हा मराठी चित्रपट २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यावेळी मंत्री संदीपान भुमरे,  मंत्री उदय सामंत,  मंत्री शंभूराज देसाई,  मंत्री संजय राठोड,  मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम,  अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, मा. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबाप्पू पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शांताराम मोरे, आमदार बालाजी कल्याणकर व चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्यासह मंत्रीमंडळातील  अनेक सहकारी  उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन करणं महत्त्वाचं आहे. हे नियोजन कशाप्रकारे करावं हे सांगताना या परीक्षेतल्या अपयशाकडेही सकारात्मक दृष्टीने पहात जिद्दीने यश मिळवता येऊ शकते हे सांगणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी  सांगितले. वेगळ्या विषयासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. 

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात  मध्यवर्ती भूमिकेत असून या दोघांसोबत  सुरेश  विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे,  सुरज चव्हाण,  अरबाज शेख, प्रणव रावराणे,  अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी),सनमीता धापटे,  वैष्णवी शिंदे, माणिक काळे,  सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत. राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाची कथा रचना करण्यात आली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive