आनंद एल राय हा नेहमीच एक धडाकेबाज चित्रपट निर्माता राहिला आहे ज्याने नेहमीच अनेक शैलींमध्ये जुगलबंदी केली आहे आणि त्यांचे प्रॉडक्शन हाऊस ऑस्कर नामांकित न्यूटन, समीक्षकांनी प्रशंसित तुंबाड, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेला निल बट्टे सन्नाटा यांसारख्या दर्जेदार चित्रपट घेवून आले आहेत. आत्मपॅम्फ्लेटसह त्यांनी प्रादेशिक सिनेमांमध्ये प्रवेश केला आहे. 73 व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटाची निवड करण्यात आली हया वर निर्माता आनंद एल राय यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
निर्माता आनंद एल राय म्हणाले"मी ७३ व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात आलो आहे आणि आत्मपॅम्फलेटच्या प्रदर्शनानंतर, प्रेक्षकांनी उत्तम कथानकाची प्रशंसा केली. प्रादेशिक सिनेमातील हे माझे पहिले पाऊल आहे आणि याला आधीच जागतिक यश मिळाले आहे. जागतिक प्रेक्षक जेव्हा तुमचे साक्षीदार होतात तेव्हा ही अभिमानाची भावना असते. आपण काम करतो आणि त्याची प्रशंसा करतो. प्रादेशिक सिनेमा जागतिक नकाशावर कोरने हा अभिमानाचा क्षण आहे. सर्वांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे".
आत्मपॅम्फ्लेट चे लेखन परेश मोकाशी यांनी केले असून दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, भूषण कुमार, कृष्ण कुमार, कनुप्रिया ए अय्यर, झी स्टुडिओ आणि मायासभा यांनी केली आहे.
प्रादेशिक सिनेमातील यशानंतर 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या झिम्माचा नुकताच दुसरा भागा ची घोषणा झालेली आहे. तापसी पन्नू स्टारर फिर आयी हसीन दिलरुबा देखील तयार होत आहे.