त्या त्रासाला कंटाळून स्विटू फेम अन्विता फलटणकरनं केली पोलिसांत तक्रार

By  
on  

'येऊ तशी कशी मी नांदायला'  या मालिकेतील स्विटू म्हणून अभिनेत्री अन्विता फलटणकर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. अन्विता  सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. डान्सच, रील्सचे आणि नवनवी फोटोशूटच्या माध्यमांतून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.  आता अन्विता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ई टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार अन्वितानं ती रहात असलेल्या भागात होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदूषणाबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

तिने या ध्वनी प्रदूषणाविरोधांत थेट पोलिसांत तक्रार केली  ाहे. ई टाईम्सच्या वृत्तानुसार ती ठाण्यात राहते. ठाण्याती ज्या परिसरात ती राहते तिथे बाजूच्या इमारतीतून मोठमोठ्याने गाण्यांचा सतत आवाज येत असतो. याचा त्रास तिच्या इमारतीतील वयोवृध्द नागरिक, लहान मुलं  यांना होतो.

अन्वितानं याआधी याप्रकरणाची तक्रार डिसेंबर २०२२ मध्ये देखील केल्याचं बातमीत नमूद केलं आहे. तसंच याबाबत जवळच्या पोलिस ठाण्यातून कोणहीती मदत झाली नसल्याचं बातमीत नमूद केलं आहे.

Recommended

Loading...
Share