By  
on  

“तुम्ही कोणाच्या मर्जीतले…” मराठी अभिनेत्याची लक्षवेधी पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता ओमकार कर्वे हा सोशल मीडियाव कायमच सक्रीय असतो. सध्या तो गाथा नवनाथांची या मालिकेत झळकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तो शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटातही झळकला होता. नुकतंच ओमकारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे. त्याच्या पोस्टने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

“तुमची काम व्हायला एकतर तुमच्याकडे भरपूर पैसे हवेत किंवा राजाश्रय हवा किंवा काम करून देणाऱ्या व्यक्तीचा त्यात फायदा हवा किंवा तुम्ही कोणाच्या मर्जीतले असायला हवे. नाहीतर घंटा कोणी विचारात नाही तुम्हाला कितीही योग्य असलात तरी”, अशी पोस्ट त्याने फेसबुकवर केली आहे. त्याबरोबर त्याने ‘…. आलेल्या अनुभवांवरून’ असे लिहित देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे.

 

ओमकारच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला सहमती दर्शवली आहे. मी त्यांच्या प्रक्रियेनुसार सर्व गोष्टी केल्या आहेत, मात्र आता या प्रणालीपुढे मी हात टेकले आहेत, असे ओमकारने एका कमेंटला उत्तर देताना म्हटले आहे. पण नेमकं त्याला काय म्हणायचंय हे स्पष्ट झालेलं नाही. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive