By  
on  

Video: “…तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा” कोकणी गर्ल अंकिताचं मनसेसाठी खास गा-हाणं

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे यांसह इतरही क्रिएटर्सने हजेरी लावली होती. राज ठाकरेंच्या कंटेन्ट क्रिएटर्सच्या भेटीवेळी शर्मिला ठाकरे व मनसे नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अंकिताचा मालवणी गाऱ्हाणं घालतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अंकिताने मालवणी गाऱ्हाणं घातल्यानंतर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हसू आल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे अंकिताचं गाऱ्हाणं राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याही पसंतीस उतरलं आहे.

 अंकिताने मनसेसाठी राज ठाकरेंसमोरच मालवणी गाऱ्हाणं घातलं आहे. “आज या ठिकाणी आम्ही सगळे जण जमलेलो असा…ते सगळेजण तुला गाऱ्हाणं घालतो ते मान्य करुन घे रे महाराजा…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो व्याप उत्तरोत्तर वाढत जाऊं दे रे महाराजा… मनसेच्या इरोधात जर कुणी काय केला असात वाकडानाकडा…तर त्याचो डाव त्याचारचं उलटां दे रे महाराजा… होय महाराजा ! बारामताचं गणित एक कर, वडाची साल पिंपळात कर…हिकडचं आमदार हिकडचं ऱ्हवांदे , पण तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा”, असं गाऱ्हाणं अंकिताने घातलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MNS Adhikrut (@mns_adhikrut)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive