By  
on  

शिव ठाकरेने सुरू केलं स्वतःचं Youtube चॅनल, काही तासांतच झाले इतके सब्सक्रायबर्स

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक झालं. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16 च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये पोहचलेला आपला मराठमोळा शिव ठाकरे हा या सीझनच्या विजेतेपदाचा दावेदार मानला गेला. एमसी स्टॅनने ट्रॉफीवर नाव कोरलं असलं तरी शिवने मनं जिंकली. या शोमध्ये त्याने भल्याभल्यांना कॉंटे की टक्कर दिली. या सीझनमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली. शिवला महाराष्ट्रातून खूप पाठिंबा मिळताना दिसला. 

शिवकडे आता नवनवीन प्रोजेक्ट्स आहेत. आता शिवने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शिवने स्वतःचं युट्युब चॅनल सुरू केलं आहे. सोशल मीडियाद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

 

शिवने युट्यूब चॅनल सुरू करताच त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही तासांमध्येच ६४ हजारांपेक्षा अधिक सब्सक्रायबर्स शिवच्या युट्यूब चॅननला मिळाले आहेत. शिव ठाकरे याच नावाने त्याने हे युट्यूब चॅनल सुरू केलं. पण या चॅनलवर पहिला व्हिडीओ शिव कधी शेअर करणार? याबाबतही त्याने सांगितलं आहे.

१ लाख सब्सक्रायबर्स झाल्यानंतरच शिव पहिला व्हिडीओ शेअर करणार आहे. या चॅनेलवर त्याच्या चाहत्यांना त्याची लाईफस्टाईल त्याचे आयुष्यातील अपडेट्स जाणून घेता येणार आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive