सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिली' ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवनकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आहे.
राज हंचनाळे आणि प्रतीक्षा शिवणकर यांनी होळी चा सण काही वेगळ्या पद्धतीने साजरा केला. 'अनंत खुशिया' आश्रम येथे जाऊन त्यांनी मुलांसोबत वेळ घालवला. होळी निमित्त चक्क पुरणपोळ्या त्या लहान मुलांसाठी ते घेऊन गेले आणि लहान मुलांसोबत पुरणपोळीचा आस्वाद घेतला. आगळ्या वेगळ्या प्रकारची होळी आणि रंगपंचमी साजरी करून त्यांना देखील एक वेगळाच आनंद झाला आहे.
मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी पाहायला विसरू नका, 'जिवाची होतिया काहिली' सोम. ते शनि. संध्या. 7.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.