'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे विनोदवीर भारत गणेशपुरे यांच्यासाठी एक दुखद बातमी आहे. त्यांना मातृशोक झाला. त्यांची आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचं गुरूवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. भारत गणेशपुरे यांच्या भावाच्या घरी मनीष गणेशपुरे यांच्या अमरावती येथील घरी त्यांच्या आईनं अखेरचा श्वास घेतला.
०९ मार्च २०२३ रोजी पहाटे वृद्धापकाळाने त्यांचे अमरावती याठिकाणी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
(Source - News 18 Lokamat )