By  
on  

अमृता फडणवीस यांची डिझाईनर विरोधात पोलिसांत तक्रार, एक कोटींची लाच केली होती ऑफर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. परंतु त्या आता वेगळ्याच कारणांनी प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांचं कोणतंच नवीन गाणं किंवा विशेष टिप्पणींमुळे त्या चर्चेत नाहीत. तर त्यांना मिळालेल्या धमकीमुळे त्या चर्चेत आहेत. एका डिझायनरनं थेट अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपये ऑफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये अमृता फडणवीस यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवल्याचं वृत्त आहे.

 

 

काय आहे नेमकं प्रकरण 

 

नोव्हेंबर 2021 मध्ये अमृता फडणवीस आणि डिझानयनर अनिक्षा यांच्यात पहिली भेट झाली. या वेळी अनिक्षाने फडणवीस (अमृता) यांना सांगितले की, आपण दागिने आणि कपड्यांची डिझायनर आहोत. आपण बनविलेले कपडे आणि दागिने आपण कार्यक्रमात वापरावे अशी विनंती अनिक्षाने अमृता फडणवीस यांना केली. त्यानंतर सागर बंगला येथे अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांच्यात अनेकदा भेटी झाल्या

दरम्यान, पुणे येथील एका कार्यक्रमात 27 जानेवारी 2023 रोजी अनिक्षा अमृता फडणवीस यांना भेटली. कार्यक्रम संपल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवताना तिने म्हटले की, तिचे वडील पोलिसांना बुकींबद्दल माहिती देत होते. ज्यामुळे पोलिसांनी सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसा कमावता येऊ शकतो. तसेच, सट्टेबाजांकडून कारवाईपासून बचावण्यासाठी आपणास पैसैही घेता येऊ शकतात. अनिशाचे बोलणे ऐकून आपण तिला तातडीने कारमधून खाली उतरवल्याचेही फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले म्हटले.

 अनिक्षाने 16 फेब्रुवारी रात्री 9,30 च्या दरम्यान त्यांना फोटन केला. तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणातून बाहेरकाढण्यासाठी आपली एक कोटी रुपये देण्याची तयारी आहे, अशी लाच देण्याचाही तिने प्रयत्न केला. पण, त्यानंर आपण तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर लगेचच 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11.55 ते 12.15 या काळात साधारण 22 व्हिडिओ क्लिप, तीन व्हॉईस नोट अनोळखी क्रमांकावरुन आपल्या व्हॉट्सअॅपवर आले, असल्याचा दावाही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत केला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive