Video : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब म्हणते, 'म्याड केलंस तू'

By  
on  

सोशल मीडिया वर विशाल राठोड यांचे प्रमुख भूमिकेत असलेले नवीन कोरे मराठी अल्बम साँग "म्याड केलंय तू" वाऱ्यासारखे प्रदर्शित झालंय. तांड्यातील मुलगा या नव्याकोऱ्या गाण्यात धुमाकूळ घालतोय. आणि त्यासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबला पाहणं रंजक ठरतंय.
       
खानदेशातून असणाऱ्या विशालच्या कलेची जिद्द या गाण्यातून पडद्यावर रेखाटतेय. विशाल राठोड सोबत या गाण्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब झळकणार असून व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनल वर हे गाणे प्रदर्शित होणार आहे. 'म्याड केलंस तू' म्हणत प्रेमाची परिभाषा मांडणारे असे  आणि तरुणाईला भुरळ पाडणारे हे अल्बम सॉंग रसिकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. १२ मार्चला या गाण्याचा टीजर आला तेव्हापासून गाण्याची चर्चा सुरू आहे, आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून  हे गाण ही प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला तर अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.

या लव्हेबल प्रेमकहाणीला सागर जनार्दन याने संगीत दिलंय. तर या गाण्याचे बोल सागर जनार्दन आणि रोहन साखरे यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर या रोमँटिक गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि लरीसा अलमेडिया यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलंय. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष महाजन याने पेलवली आहे तर संपूर्ण गाण्याला छायाचित्रकार सूरज राजपूत याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.  सीएम राठोड यांनी गाण्याच्या निर्मितीची बाजू उत्तमरीत्या पेलवली आहे. विशाल राठोड आणि शिवाली परब यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहणं उत्सुकतेच ठरतंय. 

विशालने या आधी देखील उत्तम कलाकृती अशा मराठी सिनेक्षेत्रात दिल्या आहेत. १० हुन अधिक सुपरहिट मराठी आणि बंजारा अल्बम साठी विशालने अविरत मेहनत घेतली आहे. विशाल हा मूळचा वडगाव अंबे पाचोरा तालुक्याचा असून त्याने सुरू केलेला अत्यंत मेहनतीचा प्रवास आजही तितक्याच ताकदीने विशाल पेलवत आहे. या गाण्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाचं असणार सिनेसृष्टीविषयीचं स्वप्न नव्याने पूर्ण होताना दिसतंय. निर्मिती आणि अभिनय या सोबतच विशाल स्वतः एक व्यवसायिक आहे. एम.बी.ए फायनान्स मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विशालला कायमच चित्रपट क्षेत्र आणि नृत्याची आवड आहे. 
      

चित्रपट क्षेत्रात काही उल्लेखनीय काम करू पाहणा-या तरुणांसाठी विशाल कायमच एक आदर्श ठरेल यांत वाद नाही. विशाल आणि शिवालीचे हे नवे रोमँटिक सॉंग तरुणाईच्या मनावर राज्य करतंय यांत शंकाच नाही.

Recommended

Loading...
Share