मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. वध्दापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झालीय. त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा ३०० पेक्षा चित्रपटांत त्यांनी काम केले होते. ८० च्या दशकांतील ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ ही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी लोकप्रिय ठरली
भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.