छोट्या पडद्यावरची 'आई कुठे काय करते' ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांची लाडकी मालिका ठरतेय, नवनव्या ट्विस्टमुळे ती नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. या मालिकेतल्या सरव्च व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. यात यशची प्रेयसी साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिच्या स्कुटरला अपघात झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. गौरीच्या स्कुटीला एका बाइकस्वाराने समोरून येऊन धडक दिली आहे.यात तिच्या स्कुटरचं खुप नुकसान झालं असून तिलाही दुखापत झाली हे. सुदैवाने ती या अपघातातून थोडक्यात बचावली.
‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गौरी जात असलेल्या मार्गावर एक बाईकस्वार भरधाव वेगात उलट मार्गाने आला आणि त्याने गौरीच्या स्कुटीला समोरून धडक दिली. यामुळे तिची स्कुटी रस्त्यावर स्लीप झाली. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यासोबतच तिला आणखी छोट्या दुखापतीही झाल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी आता तिला तीन आठवडे सक्तीचा आराम करण्यास सांगितला असून ती आता मालिकेतही लवकर दिसणार नाही. चाहते गौरीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
आई कुठे काय करते’ या मालिकेतील यश आणि गौरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.