By  
on  

Trailer Out : रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या मराठी सिनेमांत झळकतेय तेजस्वी प्रकाश

एक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी आणि त्याचे एक्शनपॅक सिनेमे म्हणजे सुपरहिट समीकरण हे ठरलेलं. नानाविविध गाड्यांचे स्टंट, हाणामारी, ड्रामा, एक्शन आणि जोडीला लव्हस्टोरीची फोडणी असा पुरेपूर मसाला सिनेमा देणं व बॉक्स ऑफीसवर हिट करुन दाखवणं हे रोहित शेट्टीलाच जमतं. यात कुठलाच वाद नाही. पण हा रोहित शेट्टी आता मराठी सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय. काय सांगता..विश्वास बसत नाही ना... पण हे खरं आहे...अनेक बॉलिवूडकरांच्या पावलावर पाऊल ठेवत आता रोहितसुध्दा मराठी सिनेमाची निर्मिती करतोय. 

अक्षय कुमार ,अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, संजय लीला भन्साळी, संजय दत्त यांच्यानंतर आता रोहित शेट्टीसुध्दा मराठीत पदार्पण करतोय. ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ असं त्याच्या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

रोहित शेट्टी निर्मित या पहिल्या मराठी सिनेमातून बिग बॉस विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश झळकतेय.रोहित शेट्टी निर्मित या पहिल्या मराठी सिनेमातून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश पदार्पण करतेय. विहान सुर्यवंशी यांने स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलीय. महत्त्वांचं म्हणजे सुप्रसिध्द अभिनेता जितेंद्र जोशी या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. 

 

 

lतेजस्वीने तिच्या या मराठी सिनेमाचा ट्रेलर इन्स्टाग्रामवरुन शेयर केला आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive