'सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी तर टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते पण...' किरण मानेंची स्पष्टोक्ती

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून किरण माने यांच्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर किरण माने नेहमीच विविध विषयांवर थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर ते नेहमीच चर्चेत असतात. तसंच यंदा बिग बॉस मराठी ४ चं घर गाजवण्यात ते अग्रस्थानी होते. बिग बॉस मराठीच्या टॉप 3 स्पर्धकांमध्ये किरण मानेंनी स्थान मिळवलं. बिग बॉसच्या घरात असताना त्यांना मास्टरमाईंड म्हणून संबोधलं जायचं. ट्रॉफी हुकली असली तरी प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रचंड लोकप्रियता मानेंनी मिळवली. 

जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधत एक पोस्ट केली आहे व सोबत काही फोटो देखील पोस्ट केला आहे.

किरण माने यांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते.. नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं !"..काल एका पत्रकार मित्राचा फोन आला, "उद्या जागतिक रंगभूमी दिन. रंगभूमीनं तुम्हाला काय दिलं?"'रंगभूमीनं काय दिलं?'- रंगभूमीनं काय दिलं नाही? रंगभूमीनं ओळख दिली..आत्मविश्वास दिला..भवतालाचं, समाजाचं भान दिलं..भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच 'बोली'चा गोडवाही दिला..उच्च अभिरूचीचं वरदान दिलं...सांस्कृतीक श्रीमंती दिली..रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं !अजून काय पाहिजे?सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

Recommended

Loading...
Share