भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
गिरीश बापट हे राजकीय क्षेत्रातील अनुभवी व नामवंत व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककला पसरीलय. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिताने गिरीश बापट यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीने गिरीश बापट यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट लिहलीय.
रचिता लिहते, “भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ” , असं म्हणत रुचिताने गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनेकांनी रुचिराच्या या पोस्टवर गिरीश बापट यांना श्रध्दांजली वाहिली आहे.