By  
on  

मला मुस्लिमांची भीती वाटत नाही.. शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

नाटक, मालिका आणि सिनेमांमधील चतुरस्त्र भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. विविध विषयांवर ते आपलं रोखठोक मत मांडताना दिसतात.   अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. त्याच विषयावर आधारित एक खळबळजनक पोस्ट करत शरद पोंक्षे यांनी सर्वांचं लक्षच वेधून घेतलं नाही तर चर्चेचा विषयसुध्दा ठरलेत. 

ही आहे सावरकरांच्या विचारांची धार म्हणत  पोंक्षे यांनी फोटो शेयर केला आहे. त्यात एक पोस्टर आहे, ज्यात लिहिलं आहे की, “मला मुसलमानांची भीती वाटत नाही.. इंग्रजांची भिती वाटत नाही.. हिंदूंचीच भिती वाटते. हिंदूनीच आज हिंदूत्वाशी वैर सुरू केले आहे.'' त्यांच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive