मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या सिनेमांची प्रोजेक्टसची आणि बिग बॉस होस्ट करण्याची खुप चर्चा रंगते. महेश मांजरेकरांना सत्या, सई आणि अश्वमी यांच्या सोबतच गौरी इंगवले ही सुध्दा लेक आहे. पांघरुण या चित्रपटात महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिचा भाऊ सत्या मांजरेकरने तिचे कौतुक करत कमेंट केली आहे.
सत्याने ‘पांघरुण’ या चित्रपटाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने त्याला कॅप्शन देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “गौरी तुला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा अॅवॉर्ड मिळाला, त्याबद्दल तुझे खूप कौतुक”, असे सत्याने म्हटले आहे.
सत्याने बहिणीला दिलेली दिलखुलास दाद सर्वांचंच लक्ष वेधून घेतेय.
दरम्यान, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दे धक्का २ मध्येसुध्दा गौरी प्रमुख भूमिकेत होती. तर सत्या बद्दल बोलायचं झालं तर तो आगामी ऐेतिहासिक वेडात मराठे वीर दौडले सात या महेश मांजरेकर दिग्दर्शित बिग बजेट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.