By  
on  

कमी फॉलोवर्स असल्याने या प्रसिध्द मराठी टीव्ही अभिनेत्याच्या हातून गेला सिनेमा

आज सर्वकाही सोशल मिडीयावर अवलंबून असतं. सोशल मिडीयावरुनच त्या व्यक्तीला ओळखलं जातं. सेलिब्रिटींना तर या सोशल मिडीयामुळे्च काम मिळतं. तिथे ते कायम सक्रीय असतात. सोशल मिडीयामुओळे एका प्रसिध्द अभिनेत्याला एक वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. बाळूमामा फेम अभिनेता सुमित पुसावळेचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्याची मालिका प्रेक्षकांना खुप पसंत पडते. परंतु सोशल मीडियावरील त्याच्या फॉलोवर्सच्या संख्येमुळे त्याला एका प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुमीत म्हणाला, “मी गेली अनेक वर्ष बाळूमामांची भूमिका साकारतो आहे. या भूमिकेमुळे मला प्रेक्षक ओळखतात. अनेकदा ते मला याच नावाने हाक मारतात. पण आता माझ्याबरोबर जे घडलं त्यामुळे मी खूप दुःखी झालो आहे. मी नुकतीच एका चित्रपटासाठी आणि म्युझिक व्हिडीओसाठी ऑडिशन दिली होती. या ऑडिशननंतर माझी निवडही करण्यात आली होती. पण त्यानंतर त्यांनी माझं सोशल मीडिया अकाउंट आणि त्यावरील माझे फॉलोवर्स पाहिले आणि त्यांनी थेट मला या प्रोजेक्टसाठी नकार दिला.”

तो पुढे म्हणाला, "दुर्देवाने कलाकारांचं भविष्य सोशल मिडीया ठरवतं. तुम्ही किती चांगलं काम करता याला महत्त्व नसून तुम्ही सोशल मिडीयावर किती सक्रीय आहात याला महत्त्व आहे. आता मी जास्तीत जास्त व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आता हे गरजेचं आहे असं मला वाटू लागलंय"

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive