आयपीएलचा फिवर सुरू झाला आहे. तर "सर्किट" या चित्रपटाची जोरदार हवा आहे. आयपीएल आणि टीम "सर्किट" एकत्र आले ते प्री मॅच सेशनमध्ये. या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएलमध्ये प्रमोशन झालं हे विशेष.
"सर्किट" चित्रपटातील अभिनेता वैभव तत्ववादी, अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मॅचपूर्वी माजी क्रिकेटपटू किरण मोरे आणि पूर्वी भावे यांच्याशी क्रिकेट, सर्किट चित्रपटाविषयी संवाद साधला. या गप्पांतून किरण मोरे यांनी वैभव, हृता आणि माझ्यात एक साम्य असल्याचं सांगितले . ते साम्य म्हणजे, तिघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये असतो. चित्रपटाविषयी रंगलेल्या गप्पांसह सर्किटचा ट्रेलरही दाखवण्यात आला. वैभव तत्त्ववादीनं लाईव्ह मॅचसाठी कॉमेंट्रीही केली.
आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवरील अनुभवाविषयी वैभव आणि हृता म्हणाले, की सुरुवातीला खरंच थोडे दडपण होते, पण हा अनुभव खरंच कमालीचा आणि सदैव लक्षात राहील असा होता.