शिवसेना नेत्या आणि प्रसिध्द अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर त्यांचे माजी स्विय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत.दिपाली यांचे पाकिस्तानशी संबंध असून त्यांनी तिथलं नागरिकत्व स्विकारल्याचा दावा त्यांनी केला आहे. अहमदनगर येथे भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीसयांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही असं भाऊसाहेब शिंदे यांचं म्हणणं आहे.
दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.