बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. जान्हवीला मागील काही दिवसांपासून अनेकदा तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर पाहाडियासोबत बऱ्याच ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान आता अशातच त्यांचा आणखीएक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे जान्हवी आणि शिखर पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.तसंच शिखरच्या वाढदिवशी जान्हवीने त्याचा हात पकडलेला फोटो स्टोरीवर ठेवत त्याला हॅप्पी ब्रथडे शिखू असं म्हटलं होतं.
तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघं तिरुपती बालाजी मंदिरामध्येही गेले होते. यादरम्यानचा व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी, शिखरसह खुशी कपूरही दिसत आहे.
जान्हवीने यावेळी साडी परिधान केली होती. शिखरच्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. या दोघांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Actor Janhvi Kapoor visited Tirupati Balaji Temple, Tirumala. pic.twitter.com/nYxZq7NA2A
— ANI (@ANI) April 3, 2023
यापू्ृर्वीसुध्दा शिखर व जान्हवी एकमेकांना डेट करत होते. 2016 पासून त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल बोललं जातं. परंतु मध्यंतरी त्यांच्यात दुरावा आला होता. परंतु आता पुन्हा ते एकत्र स्पॉट होऊ लागले आहेत.
शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे.