By  
on  

“कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला .... ” मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुध्द देशमुख फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांच्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

 

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“मागच्या आठवड्यात कोणाचातरी फोन आला, ते म्हणाले एका चित्रपटासाठी श्री. माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी तुम्ही ऑडिशन द्याल का, ऑडिशन म्हटलं की मी आधीच नाही म्हणून सांगतो, पण ऑडिशन कोणासाठी ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोविलकर गुरुजी यांच्या भूमिकेसाठी, (माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ . हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते. )

मी म्हटलं देतो ऑडिशन, ते म्हणाले getup वगैरे ची काही गरज नाही तुम्ही सेल्फ टेस्ट मोबाईलवर शूट करून पाठवा, पण मला तो गेटअप करावासा वाटला म्हणून मग मी आमचे मेकअप मन समीर म्हात्रे यांना म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण गुरुजींसारखा गेटअप करायचा प्रयत्न करूया.

सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही ती ऑडिशन शूटिंग संपवली, त्या कास्टिंगच्या गृहस्थाला तो व्हिडिओ पाठवून दिला, चार दिवसांनी त्याचा मेसेज आला की गुरुजींच्या भूमिकेसाठी तुमची निवड झाली नाही. Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे,आणि कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला जडलेला प्रकार आहे. पण निदान चार तास का असेना अशी भूमिका जगायला मिळाली हे पण एक कलाकार म्हणून माझं भाग्यच आहे असे मी समजतो.

एका आयुष्यामध्ये इतके विविध आयुष्य जगायला मिळणं हे फक्त एका कलाकाराच्याच भाग्यात असतं. माझ्या भाग्यात होतं म्हणून “ आई कुठे काय करते “ मालिकेमधली अनिरुद्ध देशमुख ची भूमिका अजूनही जगतो आहे.

नाहीतर आयुष्यामध्ये कधी त्याच्यासारखं तिरसट वागता आलं असतं, किती कमी कलाकारांच्या वाटेला अशी , इतक्या विविध छटांनी भरलेली भूमिका येत असेल”, अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी केली आहे.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive