By  
on  

“माझ्या मोठ्या बहिणीसाठी प्रार्थना करा”, भावाच्या निधनानंतर अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंतामुळे आणि बिग बॉस मराठी ४ मुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वाच्या लहान भावाचं अवघ्या 28 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं . या घटनेला अवघे 2-3 दिवसच उलटले असतानाच  आता अपूर्वाने आपल्या बहिणीसाठी प्रार्थना करा अशा आशयाची एक पोस्ट केली आणि नंतर ती काढूनही टाकली. 

या पोस्टमध्ये तिने तिचा भाऊ आणि बहिणीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना तिने तिच्या बहिणीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.“मला माझे संपूर्ण जग उद्धवस्त होताना दिसत आहे. पण तरीही माझा प्रार्थनांवर विश्वास आहे. मला आशा आहे की, माझी मोठी बहीण लवकरच बरी होईल. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ”, असे अपूर्वाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 दरम्यान अवघ्या दोन दिवसांपूर्वी अपूर्वाच्या भावाचे निधन झाले होते. तिने त्याच्याबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. तेव्हा ेनेटक-यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive