By  
on  

कुक कुक ! Apple च्या सीईओंसोबत माधुरीची डेट, वडा पाववर मारला ताव

संपूर्ण जगाला भुरळ घालणा-या आणि तंत्रज्ञान विश्वातील सर्वोत्तम उत्पादने देणा-या ॲपल कंपनीचे सीईओ भारत भेटीवर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच अँटिलियाला येथे जाऊन भेटले. यासोबतच त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडा पाववर देखील मनसोक्त ताव मारला आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत टीम कुक यांचा वडापाव खातानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. माुरीने हा फोटो आपल्या ट्विटरवरुन शेयर करत म्हटलंय.  'मुंबईत वडापावपेक्षा उत्तम स्वागत कशाने केलं जाऊ शकेल',टीम यांनी माधुरीने शेअर केलेला फोटो रीट्वीट करत म्हटले की, 'धन्यवाद माधुरी दीक्षित, पहिलावहिला वडापाव खाऊ घालण्यासाठी, खूपच स्वादिष्ट होता.' सर्वत्र या दोघांच्या वडापाव डेटचीच चर्चा रंगलीय. 

 

 

टीम कुक मंगळवारी मुंबईत भारतातील पहिले अ‍ॅपल स्टोअरचे उद्घाटन करणार आहेत. हे अॅपल स्टोअर मुंबईतील बीकेसी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू होणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive