By  
on  

मोदींनंतर आशा भोसले ठरल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी

 भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झालीय, त्यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा केली. 
 

2022पासून हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. आपल्या देशासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय काम करणाऱ्या, देशासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला ह्या पुरस्काराने गौरविण्यात येतं.  
 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील वर्षी पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर यंदा ज्येष्ठ गायिका आणि लता दीदींच्या धाटक्या बहिण आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या यंदा 81व्या स्मृर्तिदिन आहे. याच दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचंही वितरण केलं जाणार आहे. मुंबईतील सायन येथील श्री ष्णमुखानंद हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.  गेल्या 33 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृर्ती प्रतिष्ठान, पुणे ही सार्वजनिक चॅरिटेबल स्ट्रस्ट चालवत आहेत. याच प्रतिष्ठानातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

 

  • विशेष पुरस्कार – श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
  • विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
  • सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’
  • विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत)
  • श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
  • वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive