By  
on  

कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… , प्रशांत दामलेंची पोस्ट चर्चेत

मराठी रंगूमीसाठी वाहिलेला नट  अशी ख्याती असलेले प्रसिध्द अभिनेते दामले नेहमीच दर्जेदार नाटकांची पर्वणी चाहत्यांसाठी घेऊन येतात. गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या इचलकरंजीमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरु आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

एक फोटो प्रशांत दामले यांनी शेयर केला  आहे. यात प्रेक्षकांनी नाटकाच्या तिकीटासाठी भलीमोठी रांग लावल्याचं चित्र आहे. तेसुध्दा शिस्तीत.

“कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग – महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी…”, असे प्रशांत दामले यांनी म्हटले आहे.

प्रशांत दामले यांनी मराठी नाटकांचं कौतुक केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive