सत्या मांजरेकरच्या 'सुका-सुखी'ला शिव ठाकरेने दिली भेट

By  
on  

प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने 'सुका-सुखी'नावाचं नॉन-व्हेज स्पेशल हॉटेल सुरु केलंय. त्याच्या या हॉटेलची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलीय. सोशल मिडीयावरसुध्दा बरेच रील्स पाहायला मिळतायत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी या हॉटोलातून नॉन-व्हेज जेवण ऑर्डर केलं होतं. तसंच महेश मांजरेकरांनीसुध्दा एक व्हिडीओ शेयर करत हे  'सुका-सुखी' हॉटेल सुरु करण्यामागचं कारण सांगितलं होतं. आता आपला माणूस  शिव ठाकरेनेही त्याच्या हॉटेललं भेट दिली आहे.

शिव ठाकरे लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. त्यापूर्वी त्याने मुंबईत सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. बाप्पांच्या चरणी पोहोचून शिवने आशीर्वाद घेतले, नंतर त्याने सत्या मांजरेकरच्या नव्या हॉटेलला भेट दिली. शिवने इन्स्टाग्रामवर सत्या मांजरेकरबरोबर त्याच्या हॉटेलबाहेरचा फोटो शेअर केला आहे. ‘नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा, सत्या मांजरेकर,’ असं लिहलं आहे. 

 

गोरेगाव पूर्वेला सत्याचं हे सुका-सुखी नावाचं हॉटेल सुरु झालं आहे. 

Recommended

Loading...
Share