आज महाराष्ट्रदिनी अनेक कलाकार आपले पारंपारिक वेषातले फोटो -व्हिडीओ शेयर करतायत. सिद्धार्थदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत त्याने मराठी असण्याचा अभिमान व्यक्त केला आहे.
सिद्धार्थ नेहमीच त्याच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या घडामोडी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतो. आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थने आज त्याचा पारंपरिक वेशभूषेतील एक फोटो पोस्ट केला. त्याने लिहिलं, “जगातले सगळे पेहराव एका बाजूला आणि झब्बा-सलवार, डोक्यावर फेटा आणि कपाळावर टिळा एका बाजूला. मराठी दिसणं, मराठी बोलणं आणि मराठी जगणं याहून दुसरं सुख नाही, दुसरा अभिमान नाही. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र!”