मेहनतीनं तयार केलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाच्या सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रिन्स न मिळाल्याने कलाकारांना अक्षरश: रडू कोसळलं. मराठी सिनेमांच्या स्क्रिन्सचा ऐरणीवर असताना या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धावून आल्याचं पाहायला मिळतंय. TDM सिनेमाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे आणि कलाकारांचा थिएटरमधील भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मराठी सिनेमांच्या स्क्रिनिंगचा प्रश्न यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आला.
अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी".