By  
on  

मराठीतील पहिल्या अ‍ॅक्शन सिनेमा ‘बकाल’चा दमदार ट्रेलर पाहिलात का?

मराठी सिनेमात अ‍ॅक्शन सिनेमांची चलती फारशी नाही असं अनेकदा कानावर पडतं. पण या विचाराला छेद देणारा 'बकाल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचं समजत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन समीर आठल्ये यांनी केलं आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात विदर्भातील तरुणांना गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्यात जखडून ठेवणाऱ्या ‘बकाल’ नावाच्या एका विखारी, अदृश्य यंत्रणेने अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

 

अशा ‘बकाल’ नावाच्या घातक शक्तीला एका समांतर सुरक्षा संघटनेच्या युवकांनी मोठ्या शिताफीने आश्चर्यकारकरित्या उध्वस्त केले. ह्या सत्यघटनेच्या आणि विदर्भाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ‘मारबत’ परंपरेच्या मूळ उद्देशाच्या आधारावर ‘बकाल’ बेतलेला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने चैतन्य मेस्त्री आणि जुई बेंडखळे ही फ्रेश जोडी सिनेमात पदार्पण करत आहे. अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेला हा सिनेमा 8 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive