By  
on  

दुमदुमला शिवरायांच्या नावाचा घोष, ‘फत्तेशिकस्त’ मधील नवीन गाणं रसिकांच्या भेटीला

 स्वराज्यातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट रसिकांसमोर घेऊन येण्यास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीम सज्ज झाली आहे. आगामी ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमाविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. या सिनेमातील नवीन गाणं ‘रणी फडकती लाखो झेंडे’ हे रसिकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला वि. स. खांडेकरांच्या सिद्धहस्त लेखणीची धार आहे.

अजय पुरकर आणि आशुतोष मुंगळे यांनी या गाण्यावर स्वर साज चढवला आहे. देवदत्त बाजी यांनी या गीताला संगीत दिलं आहे. या गाण्यात शिवगौरव आपल्याला पाहायला मिळतो. शिवराय आणि त्यांचे शिलेदार यांचं दर्शन या गाण्यातून घडतं. कलाकारांचा भला मोठा ताफा असलेल्या या गाण्याचं चित्रकरण भव्य असंच आहे. 

 

या सिनेमात चिन्मय मांडलेकर शिवरायांच्या भूमिकेत आहे. याशिवाय मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे हे कलाकार आहेत. 
फर्जंदनंतर दिग्पाल यांचा हा दुसरा ऐतिहासिक सिनेमा आहे. शिव शौर्यावर आधारित हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive