By  
on  

अनन्याच्या जिद्दी व्यक्तिरेखेत हृता दुर्गुळे दिसणार?

रंगभूमीवर अनेक विक्रम रचणा-या ‘अनन्या’ हे नाटक आता सिनेमाच्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. रंगभूमीवर या नाटकात ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. आता हे नाटक सिनेमाच्या रुपात समोर येत असल्याने याच्यात मुख्य भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे अनन्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे.

 

तसं असेल तर हा हृताचा पहिलाच सिनेमा असेल. हृता अलीकडेच ‘फुलपाखरु’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील तिचा अभिनय आणि लूक्सची मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. याशिवाय ती रंगभूमीवर ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकात देखील दिसली होती. या     सिनेमाची निर्मिती रवी जाधव करणार असल्याचं समोर येत आहे. तर दिग्दर्शन प्रताप फड करणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive