By  
on  

‘पानीपत’मध्ये झळकणार मराठमोळी कृतिका देव

आशुतोष गोवारीकर यांच्या ऐतिहासिक ‘पानीपत’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या महत्त्वाकांक्षी बिग बजेट सिनेमात अनेक मराठी कलाकार आहेत. त्यापैकीच एक आहे कृतिका देव. कृतिकाने हॅपी जर्नी या सिनेमातून मराठी सिनेमात पदार्पण केलं. त्यानंतर  हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे अँड सन्स, बकेट लिस्ट या सिनेमांमधून अभिनय कौशल्य दाखवलं आता ती आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ या सिनेमात दिसणार आहे.

 

 

खुद्द कृतिकानेच यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘ पानीपतचा ट्रेलर पाहून आनंद झाला. मी देखील या सिनेमाचा एक भाग आहे. आम्ही जवळपास एक वर्षभर या सिनेमाच्या शुटिंगमध्ये गुंतलो होतो. सगळ्या जिनियस लोकांसोबत काम करताना मजा आली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just being the usual self

A post shared by Krutika (@mekrutikadeo) on

 

याठिकाणी माझे काही उत्तम मित्रही बनले. मी इतकी सुदैवी आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मला या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल रोहन मापुस्कर तुझे खुप आभार’. पानीपतमध्ये सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत अर्जुन कपूर दिसत आहे तर अहमदशाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त दिसत आहे.

 

 

कृती सेनॉन पार्वतीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.  हा सिनेमा 6 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive