By  
on  

पाहा Photos : 'फत्तेशिकस्त’चा दिमाखदार प्रिमियर सोहळा

शत्रूच्या छातीत धडकी भरविणाऱ्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जगभर पोहचला. चाणाक्ष युद्धनीती अन् रणनीती हीच खरी महाराजांची ओळख. गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले.

आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना हाणून पाडत. शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ या मल्टिस्टारर  चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

'फत्तेशिकस्त’ या चित्रपटाचा शानदार प्रिमियर नुकताच सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

'फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास याप्रसंगी उलगडून दाखवत 'फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचे आभार व त्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. आजपर्यंत कथा, कादंब-या आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास फत्तेशिकस्त’ च्या रुपाने प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल अशी प्रतिक्रिया देत मान्यवरांनी चित्रपटाचे व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले.

अजय-अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत. ए.ए.फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या सर्व चित्रपटगृहात झळकणार आहे.

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive