By  
on  

मराठी कलाकार म्हणतात #पुन्हानिवडणूक? कॉंग्रेसला वाटतं यांचा भाजपशी संबंध

राज्यात स्थिर सरकार केव्हा स्थापन  होईल याकडे अवघ्या महाराष्ट्राची जनता डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतानाच नुकतंच मराठी सिनेसृष्टीचं राजकीय पक्षाशी काहीतरी कनेक्शन असल्याच्या शंकेने एका नव्या वादाला पेव फुटलं आहे आणि याचं मूळ अर्थातच नेहमीप्रमाणे सोशल मिडीया आहे. 

 मराठी सुपरस्टार सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर आणि अंकुश चौधरी या कलाकारांनी आज '#पुन्हानिवडणूक?' हा हॅशटॅग सोशल मिडियावर ट्रेंड केला आहे. अनेकांना त्यांच्या या ट्विटचा अर्थच कळेनासा झाला आहे आणि सामान्य तर संभ्रमावस्थेत आहेत. पण या हॅशटॅगवरून काही नेटकरी मात्र त्यांच्यावर चांगलेच उखडले आहेत.

 

इतकंच नव्हे तर काही राजकारणी देखील या कलाकारांना ट्रोल करताना दिसत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सावंतानी देखील या कलाकारांचा निषेध केला आहे. 
भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलण्यासाठी या कलाकरांना कुणी सांगितलं होतं, भाजपाच्या आयटी सेलशी या कलाकारांचा काय संबंध,  याची पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी आपल्या ट्विटरवरुन केली  आहे.तर सामान्य या कलाकारांच्या ट्विटवर म्हणतायत,  ‘कलाकारांनी सिनेमांपुरतंच मर्यादित रहावं’,'राजकारणात पडू नका नाहीतर जनता सिनेमाचं राजकारण करेल...', .अशा आशयाच्या पोस्टही झळकताना दिसत आहेत. 

 

 

पण या कलाकारांच्या हॅशटॅगच कारण मात्र  काही भलतंच आहे. या कलाकारांनी त्यांच्या आगामी ‘धुरळा’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे सगळं केल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. नेहमीप्रमाणेच सोशल मिडीया प्रोमोशन फंड्यासाठी सर्वात उत्तम प्लॅटफॉर्म समजला जातो. '#पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग ट्रेंड करत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितील तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत आहे. 

 

 

समीर विध्वंस दिग्दर्शित ‘धुरळा’हा सिनेमा येत्या जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Recommended

PeepingMoon Exclusive