By  
on  

मागील काही दिवसात मराठी सिनेमांचं धवल यश, पाहा कोणते आहेत हे सिनेमे

मराठी सिनेमा आता चांगलंच बाळसं धरू लागला आहे. एरवी कमी थिएटर आणि प्रेक्षकांची रोडावलेली संख्या हे समीकरण बदलताना दिसत आहे. अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पाहुयात कोण कोणते आहेत हे सिनेमे: 

हिरकणी: 
यंदाच्या दिवाळीत देखील दोन मराठी आणि तीन हिंदी असे एकूण ५ चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हिरकणीने बाजी मारली. एका आईच्या धाडसाची, धैर्याची आणि पराक्रमाची गाथा असलेला हा सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरला होता. हा सिनेमा प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केला आहे. चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमाची पटकथा लिहली आहे.

 

खारी बिस्कीट: 
भावा-बहिणीच्या नात्यावर आधारलेला सिनेमा देखील रसिकांना आवडला. 'खारी बिस्कीट' म्हणजे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. त्यांच्या बाँडिंगवर आधारलेला हा सिनेमा अनेकांना आवडला.

 

फत्तेशिकस्त: 
शिवरायांच्या गनिमी कावा या युद्धनितीने भल्याभल्यांची झोप उडवली. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा घेऊन दिग्पाल लांजेकर रसिकांच्या भेटीला आले आहेत.  गनिमी कावा’ चे तंत्र वापरत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive