अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता परीक्षकाच्या खुर्चीत

By  
on  

सध्या टेलिव्हिजनवर अनेक सांगीतीक रिअॅलिटी शो प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. यामध्ये आणखी एका नव्या शो ची भर पडत आहे. या शोमध्ये राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे परीक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक चेहरा परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळणार आहे. 

हा चेहरा म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. सुत्रांच्या माहीतीनुसार आगामी संगीतविषयक शो मध्ये मृणाल कुलकर्णी राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदेसह परीक्षकाच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. 

सध्या महाराष्ट्रात 'फत्तेशिकस्त' सिनेमाने प्रेक्षकांची पसंती मिळावली आहे. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातलं शौर्यपर्व या सिनेमातुन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात मृणाल कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊसाहेब यांची भुमिका साकारली आहे. आता मृणाल कुलकर्णी यांच्या या नव्या शो विषयी त्यांच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share