By  
on  

'उनाड' सिनेमाचं फर्स्ट शेड्यूल रॅप अप

निर्माते अजित अरोरा आणि प्रसिध्द दिग्दर्शक आदित्य सरपोतदार 'उनाड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन  येणार आहेत. निर्माते अजित अरोरा यांनी  "३७७ अब नॉर्मल" सारख्या ब्लॉकबस्टर वेब सिरीजमधून छाप पाडली आहे आणि फिल्म मेकिंगच्या जगामध्ये एक वेगळे स्थान बनवले आहे.

अजित अरोरा म्हणाले, "मराठी चित्रपट आता अशा स्थानावर आहे की ते सर्व भारतीय आवडीने पाहतात, "सैराट" सारखे चित्रपटाने मराठी चित्रपटाची प्रतिमाच बदलून टाकली आहे आणि मला विश्वास आहे कि 'उनाड' हे एक असा चित्रपट आहे कि तो  मराठी सिनेजगतात आपली छाप पाडेल , 'उनाडचे" पहिले शेड्युल आता संपले असूव  आम्ही लवकरच दुसऱ्या शेड्युलची तयारी सुरु करणार आहोत. 

'उनाड'चे दिग्दर्शन' 'क्लासमेट', 'फास्टर फेणे', 'माऊली' फेम' आदित्य सरपोतदार यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती अजित अरोराचे प्रोडक्शन हाऊस  "ऑरोरा प्रोडक्शन " त्या सोबत "अर्था क्रिएशन्स" आणि "नम्रता आर्टस्" सुद्धा सहभागी आहे. चित्रपट एक नवीन व  जबरदस्त  कथा आहे, ज्याची शूटिंग कोकणच्या सुंदर परिसरात केले आहे आणि ह्यात सर्वांचे लाडके कलाकारसुध्दा झळकणार  आहेत. 

'उनाड' सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive