By  
on  

सुबोध भावे म्हणतो 'हे भयानक वास्तव आहे', जाणून घ्या

नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधून मध्य रेल्वेने २५ डिसेंबर रोजी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष मेगाब्लॉक जाहीर केला होता त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे ठाणे ते डोबिंवली स्थानकादरम्यान प्रवांशाच्या गर्दीने एकच गोंधळ माजला. 

या भीषण गर्दीच्या बातम्या काल दिवसभर व्हायरल झाल्या. या बातमीवर सिनेसृष्टीतील संवेदनशील अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून खंत व्यक्त केली आहे. सुबोध म्हणतो, "भयानक आहे हे,आणि हे रोज जगावं लागत,
ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे.भारतीय रेल्वे सक्षम आहेच.केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीत प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती."

हा 25 डिसेंबरचा विशेष मेगाब्लॉक कल्याण ते डोंबिवली स्थानकादरम्यान सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ पर्यंत होता. हा एकूण चार तासांचा विशेष मेगाब्लॉक होता. मेगाब्लॉकमुळे १२४ लोकल, १६ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive